कायदा-सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पालिकेने मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवावेत ----संदीप वर्पे
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी ------ कोपरगाव शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठ यांच्या सुरक्षिततेसाठी कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी गुरुवार 31 डिसेंबर रोजी पालिकेला निवेदन देऊन केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव शहरात दिवसेंदिवस ढासळत चाललेली कायदा-सुव्यवस्था तसेच समाजकंटकांकडून होत असलेल्या कुरापती लक्षात घेता कोपरगाव शहरात घडणाऱ्या सामाजिक कृत्यांचा छडा लावणे करता कोपरगाव शहरातील मुख्य रस्ते शहराबाहेर जाणारे रस्ते बाजारपेठ या ठिकाणी कोपरगाव पालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी संदीप वर्पे यांनी केले आहे सीसीटीव्ही बसवल्यामुळे पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी मदत होईल व कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मदत होईल तरी पालिकेने सामाजिक दायित्वातुन शहरांमध्ये लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवावे असेही निवेदनात शेवटी म्हटले आहे.
0 Comments