सहकार चळवळीत व्यक्तित्वाने आणि कर्तुत्वाने काका कोयटेंनी ठसा उमटविला.- शाम जाजू.
समता पतसंस्था संचालक मंडळाच्या सभागृहाचा नामकरण सोहळा संपन्न.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :------- कै.मोहनशेठ झंवर यांनी महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळ आदर्श बनविली. त्यांच्या सारखे आदर्शवत व्यक्तिमत्व तयार झाले पाहिजे, त्यांनी केलेल्या आदर्शवत मार्गावरून समता नागरी सहकारी पतसंस्थेचे मार्गक्रमण झाल्याने समता नागरी सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था झाली आहे. १००० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय असणाऱ्या समता पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभागृहाला स्व.मोहनलाल झंवर यांचे नाव देऊन उचीत गौरव केला आहे. या सभागृहात सर्वसामान्यांच्या निर्णय घेतले जातील. असे गौरोद्गार समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ सभागृहाला कै.मोहनशेठ झंवर यांच्या नामकरण समारंभाप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मान.श्री.श्यामजी जाजू यांनी काढले.समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहाचे कै.मोहनलाल आनंदराम झंवर नामकरण २० डिसेंबर २०२० रोजी स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. तसेच ते पुढे ते म्हणाले कि, ‘सहकार चळवळीत व्यक्तित्वाने आणि कर्तुत्वाने ठसा उमटविणारे काका कोयटे यांना केंद्रात येणाऱ्या सहकार चळवळीविषयी माझे नेहमीच सहकार्य असेल. ‘विना संस्कार नाही सहकार’ या उक्ती प्रमाणे सहकारातील समता नागरी सहकारी पतसंस्था एक मूर्तिमंत उदाहरण आहे. समताचे संचालक मंडळ म्हणजे कल्पनांचे क्रियान्वय होय.कोणत्याही बँकेला लाजवेल असे पारदर्शक काम आज समता स्पर्धेच्या युगात करत आहे. अनेक विचारातून सहकार चळवळ आणि समता पतसंस्था काका कोयटे यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वी होत आहे.
कै.मोहनशेठ झंवर माहेश्वरी समाजासाठी एक भूषण होते. त्यांनी माहेश्वरी समाजाची शान वाढवत अनेक महत्वाची सामाजिक कार्ये करत माहेश्वरी समाजाची ओळख त्यांच्या कार्यातून करून दिली. तसेच समताच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांचे नाव सभागृहाला देणे अभिमानास्पद आहे. असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किसनजी भन्साळी यांनी मनोगत व्यक्त करताना काढले. अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी कार्यकरी संचालक श्री. आर. डी. मंत्री मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, ‘कै.मोहनशेठ झंवर यांचे नाव आणि त्यांचे कार्य हे त्यांनी त्यांच्या कार्य कर्तृत्वातून दाखवून दिले त्यामुळेच त्यांची आजही उणीव भासत आहे. संचालक मंडळाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून संचालक मंडळ निश्तितच कौतुकास पात्र आहे. संचालक मंडळाला माझ्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि समताची भरभराट होवो.’ असे गौरोद्गार काढले.त्यानंतर नामकरण समारंभ सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि, ‘ समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक असेलेले कै.मोहन झंवर समता पतसंस्थेच्या माध्यमातून छोटे मोठे व्यापारी दुकानदारांना न्याय देण्यासाठी नेहमीच आग्रही असायचे, त्याचप्रमाणे कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनद्वारे व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असत. त्यामुळे कोपरगाव शहरातील व्यापारी, किराणा दुकानदार, समता पतसंस्थेचे सभासद कै.मोहनशेठ झंवर यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाला कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या स्मृती जतन करून ठेवण्यासाठी समता पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभागृहाचे नामकरण देखील त्यांचे नावाने आज करण्यात आलेले आहे.’
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे व उद्घाटक श्री श्यामजी जाजू व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोषजी मंडलेचा यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे, किसनजी भन्साळी यांचा सत्कार जेष्ठ संचालक जितुभाई शहा, आर.डी. मंत्री यांचा सत्कार संचालक अरविंदजी पटेल, विठ्ठल आसावा व चेतन भुतडा यांचा सत्कार चांगदेव शिरोडे, अनिषजी मणियार यांचा सत्कार संचालक रामचंद्र बागरेचा, दिलीप बजाज यांचा सत्कार संचालक गुलशन होडे, अजय जाजू यांचा सत्कार कचरू मोकळ, संतोष मुंदडा यांचा सत्कार सचिन भट्टड, श्रीमती सुमनबाई झंवर यांचा सत्कार सुहासिनी कोयटे यांनी केला. या सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजू हे प्रमुख पाहुणे तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोषजी मंडलेचा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्री किसनजी भन्साळी, अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी कार्यकरी संचालक आर. डी. मंत्री., कै.मोहनलाल झंवर यांच्या पत्नी श्रीमती सुमनबाई झंवर, पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक विजय झंवर, अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभा संयुक्त मंत्री विठ्ठल आसावा, जिल्हाध्यक्ष अनिषजी मनियार, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बजाज, सचिव अजय जाजू, कोपरगाव तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष संतोष मुंदडा, श्रीरामपूर तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष चेतन भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती तर कै.मोहनशेठ यांचे स्नेही रावजी पटेल, अजितभाऊ लोहाडे, भास्कर आढाव, प्रसिद्ध उद्योजक कैलासशेठ ठोळे व मित्र परिवार, झंवर परिवार, समता पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, जेष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल, अरविंदभाई पटेल, रामचंद्र बागरेचा, जितुभाई शहा, चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे, गुलशन होडे, कचरू मोकळ, संचालिका सौ.शोभा दरक समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे, समताचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड, समताच्या महाराष्ट्रातील विविध शाखांचे शाखाधिकारी, कर्मचारी, अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या समारंभाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी मानले.
0 Comments