आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अज्ञातांनीभुमीपूजन फलक फाडल्याने कोपरगावात तणाव.

अज्ञातांनीभुमीपूजन फलक फाडल्याने कोपरगावात तणाव.

कडक कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी.

कोपरगाव प्रतिनिधी :------  कोपरगाव शहरातील आंबेडकर चौकात मंगळवारी २९ रोजी विविध विकासकामांचे उद्घघाटन तालुक्याचे आमदार आशुतोष काळे , नगराध्यक्ष विजय वहाडणे पालिकेचे  अधिकारी वर्ग आदींच्या उपस्थित आंंबेडकर  मैदानावर काँक्रीटीकरण भुमीपूजन कामाचा फलक लावून चोवीस तास होत नाही तोच अज्ञात समाजकंटकाकडून लावलेला बोर्ड फाडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बोर्ड फाडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी चे  नगर जिल्हाकार्याध्यक्ष संदिप वर्पे शहरध्यक्ष सुनिल गंगुले नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाघचौरे  संदिप पगारे यासंह पालिकेचे अभियंता वाघ आदि त्याठिकाणी होते घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे घटनास्थळी दाखल झाले व  पंचनामा केला व पालिकेच्या अधिकाऱ्यांना फिर्याद दाखल करण्याच्या सूचना केल्या.यावेळी संदिप वर्पे म्हणाले बोर्ड फाडणे आतिशय लांच्छनास्पद आहे यामागे राजकीय  शक्तीचा यामागे हात आहे. सर्व सामान्य नागरिकांना विकास पाहिजे ते हे काम करू शकत नाही. गेल्या चाळीस वर्षांपासून विविध विकासकामे प्रलंबित होते. ते आमदार आशुतोष काळे करत आहेत. बोर्ड फाडणारे उद्या पाच नंबर साठवण तलावात उड्या मारणार का? असा संतप्त सवाल करून बोर्ड फाडणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.यावेळी सुनील गंगुले म्हणाले की , पोलिसांनी सीसीटीव्ही च्या माध्यमातून अज्ञात समाजकंटकांचा छडा लावून कडक कारवाई करावी अशी मागणी केली.तसेेच घडलेेल्या घटनेेेबाबत   कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू आहे

Post a Comment

0 Comments