आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त व व जेष्ठ पत्रकार अशोक भिमाशंकर खांबेकर यांचे निधन.

 शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त व व जेष्ठ पत्रकार अशोक  भिमाशंकर खांबेकर यांचे निधन.  

कोपरगाव प्रतिनिधी :---- शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त व व जेष्ठ पत्रकार अशोक  भिमाशंकर खांबेकर  (वय-६५) यांचे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नाशिक येथे कोरोनाचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी मीनल खांबेकर,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अशोक खांबेकर  अखेरपर्यंत काँग्रेसचे समर्थक होते.त्यांनी नगर जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठे योगदान दिले.ते पी.टी. आय.चे पत्रकार म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे सेवा केली. त्यांचा जनसंपर्क भारतभर पण दांडगा होता.अनेकांची नावे व मोबाईल क्रमांक ,नातेगोते,अधिकारी त्यांचे पद यांचे ते चालते-बोलते संगणक होते.

त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यांना आधीच दीर्घ आजार असल्याने कोरोना उपचारासाठी त्यांच्यात प्रतिकार शक्तीने साथ न दिल्याने आज नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मालवली आहे.
त्यांच्या निधनाने आ.आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपीनदादा कोल्हे,राजेश परजणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे शिवसेना नेते राजेंद्र झावरे ,कैलास जाधव आदिंंनी दुःख व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments