साईबाबा कन्या व कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेसाठी अडवणुक ------ विशाल कोळगे.
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी:------ श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात ११वी साठी कला वाणिज्य विज्ञान तर १२वी साठी सुध्दा मुले व मुली शिक्षण घेत आहे कला शाखेसाठी तीन तुकड्यांना मान्यता असताना जागा नाही असे सांगून प्रवेश नाकारला जात आहे
एका मुलाने कला शाखेत प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी कागदपत्रे सादर केली असता तु अकरावी. कलाशाखेत प्रवेश घेऊ नको जागा नाही उपलब्धत नाही असे सांगून इतर शाखेत प्रवेश मिळेल असे सांगितले जाते या बाबत थेट विकास शिवगजे यांच्या कडे चौकशी केली असता दोन तुकड्यात भरपूर मुले मुले भरली आहे जागा नाही असे सागत वेगळ्या शाखेत प्रवेश देतो नंतर बघु असे असे सांगितले
या बाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण उपनिरीक्षक वाळके यांच्या कडे तक्रार केली असता प्रवेश मिळेल असे सांगितले
तिसऱ्या तुकडीत दहा वीस मुले सुध्दा चालतात
असे घडत असेल तर याची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बंगाटे यांनी
करण्याची गरज आहे एकीकडे साईबाबा संस्थान परीसराच्या हितासाठी आधुनिक सर्व सुविधा युक्त २५०कोटी रुपयांचे शैक्षणिक संकुल उभे करत असताना सहायक शिक्षक व या ठिकाणी प्रभारी असलेल्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे या बाबत प्राचार्य गंगाधर वरघुडे यांच्या शी संपर्क साधला असता कला शाखेत प्रवेश मिळेल विद्यार्थी पाठवा असे सांगितले असे असताना ग्रामीण भागातील काॅलेज मध्ये. कोणत्याही शाखेत ५०ते६०मुले आवश्यक असताना एकाच वर्गात जास्त मुले मुली का बसवले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे यांनी केली आहे
साईबाबा संस्थान घ्या वृध्दी वेबसाईट वर अकरावी कला शाखेचा उल्लेख नाही .सहजपणे साईबाबा संस्थान काॅलेज मध्ये प्रवेश मिळावा मोफत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न होत असताना इतर शाखेचा उल्लेख असताना अकरावी कला शाखेचा विसर नेमका कसा पडला.
विशाल कोळगे.
0 Comments