Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

स्टेट बॅक ऑफ इंडिया कडून आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गर्ल्स गुरुकूल साठी संगणक लॅब चे लोकार्पण .

 स्टेट बॅक ऑफ इंडिया कडून आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गर्ल्स  गुरुकूल साठी संगणक लॅब चे लोकार्पण .





कोपरगाव प्रतिनिधी :------ स्टेट बँक ऑफ इंडिया च्या प्रशासनिक कार्यालय , पुणे कॉर्पोरेट  सामाजिक दायित्व विभागाच्या  " बेटी बचाओ , बेटी पढाओ " अभियानातर्गत  आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गर्ल्स गुरुकूल साठी ३४ अत्याधुनिक संगणक युक्त " एस बी आय लॅब " चे लोकार्पण २० डिसेंबर २०२० स्टेट बॅकेच्या दक्षिण महाराष्ट्राच्या जनरल मॅनेजर श्रीमती सुखविंदर कौर यांचे हस्ते करण्यात आले.  तसेच यावेळी  आत्मा मालिक हॉस्पिटल व जिल्हा शासकिय रुग्णालयासाठी कोविड १९ सुरक्षा साठी पी.पी.ई. किट प्रदान करण्यात आले .

याप्रसंगी बोलताना श्रीमती कौर म्हटल्या की, ‘बेटी बचाओ’ बेटी बढाओ’ या अभियानाला स्टेट बॅंकेने आपला पाठिंबा दिला असून त्याअंतर्गत मुलींनाही अत्याधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने स्टेट बॅकेने ही संगणक लॅब आत्मा मालिकला उभारून दिली आहे. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये प.पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या अध्यात्मिक संस्काराच्या छायेत नवी पिढी घडत आहे. गुणत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीत आत्मा मालिकने महाराष्ट्रात गौरव संपन्न केलेला आहे. आत्मा मालिकच्या या कार्यात स्टेट बॅकेचेही योगदान आहे. याबद्दल त्यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला.  

सदर कार्यक्रमासाठी प्रसंगी राजीव गुप्ता , रजनिश वर्मा ,मोहिते  , मिश्रा , बी. जे . प्रसाद  ,ज्ञानेश्वर टाकळे इत्यादी स्टेट बॅक ऑफ इंडियाचे अधिकारी. तसेच  आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठानचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे , विश्वस्त प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे ,  श्रीधर गायकवाड , व्यवस्थापक हिरामण कोल्हे , सुधाकर मलिक, प्राचार्य माणिक जाधव , कांतीलाल पटेल  निरंजन डांगे , संदिप गायकवाड , नितिन सोनवणे , मिनाक्षी काकडे  आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी कु . वैष्णवी  करंडे हिने मनोगत व्यक्त केले तर समीक्षा लोंढे, मयुरी खांडवी, तेजस्विनी पाटील, स्वराली खोडे व वैशाली या गुणवंत विद्यार्थीनींचा स्टेट बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच देसाई सर व तांबे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण चे सरचिटणीस श्री . हनुमंतराव भोंगळे यांनी सद्‌गुरूंचा आत्म संदेश  देवून उपस्थितीतांचे आभार मानले.

 


Post a Comment

0 Comments