आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगाव शहर वासियांनी दिवसाआड पाणी पुरवठा करा - भारतीय जनता पार्टीची मागणी

 कोपरगाव शहर वासियांनी दिवसाआड पाणी पुरवठा करा - 

भारतीय जनता पार्टीची मागणी
कोपरगाव प्रतिनिधी ------  कोपरगाव नगरपालिकेच्या मालकीची चारही तलाव पुर्ण क्षमतेने भरले असल्याचे नगरपालिकेने जाहीर केले, तरीही कोपरगावकरांना सहा दिवसाआड पाणी का ? असा सवाल उपस्थित करून शहरवासीयांना दिवसाआड पाणी देण्यात यावे अशी मागणी कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष दत्ता काले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

येसगाव येथील नगरपालिकेच्या मालकीच्या तलावामध्ये पाणी सोडण्यात आले. सध्या चारही तलाव पुर्ण क्षमतेने भरण्यात आल्याचे नगरपालिका प्रशासनाने जाहीर केलेले आहे. पाणी नसतांना शहरवासीयांनी नगरपालिकेची अडचण लक्षात घेतली परंतु पाणी असतांनाही नागरीकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम नगरपालिकेकडून होत असल्याने नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त आहे. 
नागरीकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याची नगरपालिकेची जबाबदारी असतांना योग्य नियोजन होत नसल्याने त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. वास्तविक यापोटी आकारण्यात येणारी रक्कम नागरीकांकडून वसूल केली जाते. त्याबदल्यात त्यांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळत नाही. नेहमीच आवर्तनाचे कारण सांगून नागरीकांना वेठीस धरले जात असून पाणी असतांना नागरीकांसाठी विविध कारणे सांगून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, हे निश्चितच योग्य नसून तलावात पाणी असल्याने सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याऐवजी शहरवासीयांना दिवसाआड पाणी देण्यात यावे,अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी शहराध्यक्ष दत्ता काले, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, कैलास खैरे, अविनाश पाठक, अशोक लकारे, विजय चव्हाणके, सत्येन मुंदडा, सोमनाथ आहिरे,बापू पवार, जयेश बडवे, अकबर लाला शेख, खालिकभाई कुरेशी, शंकर बिऱ्हाडे, संतोष साबळे, विकी मंजुळ, शक्ती परदेशी, मंदार बागले, सतिष चव्हाण, नरेंद्र लकारे, सोमनाथ म्हस्के, बंटी पांडे, चंद्रकांत वाघमारे, फकीरमहंमद पहिलवान, गोरख चोपडे, नितीन सावंत दौलत लटके यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदि उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments