आज कोरोनोने घेतला पुन्हा एकाचा बळी , रुग्ण वाढ सुरुच.
संपादक :- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक :-योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी :--- सध्या परिस्थिती गंभीर होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे शहरातील नागरिक हे तोंडाला मुखपट्टी बांधत नाही ही मोठी चिंतेची बाब आहे कोरोनो विषयी जर नागरिक गाफील पणे वागत असेल तर भारतात ज्या प्रमाणे काही राज्यांमध्ये दुसऱ्या कोरोनो च्या लाटेमुळे पुन्हा एकदा लाँकडाउन करण्यात आले आहे. ही परिस्थिती जर बदली नाही तर महाराष्ट्रातही लाँकडाउन करण्याची वेळ येवू शकते. हे नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा काही नागरिकांच्या चुकीच्या वागण्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल.
शहर १तर ग्रामीण मध्ये २ कोरोनो बाधीत.
* आज गुरवार *
दिनांक१७ डिसेंबर
आज शहरातील गुलमोहर काँलनीतील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनो मूत्यू झाला आहे.
आज एकूण २० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले तर खाजगी अहवालात २ रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह तर नगर येथील अहवालात ०असे एकुण३ रुग्ण बाधित आढळले
तसेच नगर येथे रुग्णांचे स्वैबचे ०नमुने तपासणी करीता पाठविले आहेत
कोपरगाव शहर
१)साईसिटी :--१
ग्रामीण
१) पोहेगाव -१
२)सोनेवाडी :-१
असे शहर १व ग्रामीण २मिळून ३ रुग्ण बाधित आढळले आहे .
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे आज १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पर्यंत कोरोना बाधितांची संख्या २५९८ व
आज पर्यंत एकूण बरे झालेले - २५०९
ऍक्टिव्ह - ४८ तर
आतापर्यंत मृत झालेले - ४३
0 Comments