दारु पिऊन महिलेस शिविगाळ व मारहाण प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात राहणाऱ्या मनजोतसिंग अमरजितसिंग भाटिया या राहत असलेल्या ठिकाणी शतपावली करत असतांना त्याच भागात राहणाऱ्या सहा जणांनी त्यांच्यासह सतनाम सिंग यांना शिवीगाळ तसेच लाथाबुक्यांनी व दगडाने मारून जखमी केले. याबाबत थोडक्यात माहिती अशी की मनजोतसिंग भाटिया व सतनाम सिंग हे मंगळवार १५ डिसेंबर रोजी रात्री आपले काम आटोपून शतपावली करत असतांना संदिप शिरसाठ, रवी कुंदे, अमित लकारे, स्वप्निल मंजुळ, पप्पू शेंडगे, रोहन कदम सर्व राहणार दत्तनगर हे त्या ठिकाणी दारू पिऊन आले व त्यांनी विनाकारण मनजोतसिंग भाटीया या महिलेसह सतनामसिंग या दोघांना कुठलेही कारण नसताना शिविगाळ करुन मारहाण केली यातील संदिप शिरसाठ याने सतनमासिंग यांच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले तसेच त्यांच्या घरासमोरील पाण्याचे नळ कनेक्शन व मोटरसायकल ची तोडफोड करुन नुकसान केले याबाबत भाटिया यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रमांक ८४१/२०२०भां दं वी.कलम १४३,१४७,१४९,३२४,३२३,५०४,५०६, ४२७ माहा.पो.का.१४४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.बी.एस कोरेकर हे करत आहे.
0 Comments