आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

उत्तर महाराष्ट्र व्यापारी संघटना प्रतिनिधींचा कोपरगावात भव्य मेळावा

उत्तर महाराष्ट्र व्यापारी संघटना प्रतिनिधींचा कोपरगावात भव्य मेळावा 
कोपरगाव प्रतिनिधी :------ उत्तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यासह आजूबाजूचे जिल्ह्यातील किरकोळ व्यापारी हा स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केंद्रातील सरकार सर्वोतोपरीने प्रयत्न करून व्यापारी किराणा दुकानदार आणि सामान्य विक्रेता हा आत्मनिर्भर बनत चालला आहे. केंद्राच्या निर्णयानुसार आत्मनिर्भरतेवर अवलंबुन राहून बदलत्या परिस्थितीला प्रत्येकाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच काळानुरूप छोटे किरकोळ व्यापारी, व्यावसायिकांना बदलावे लागणार आहे. या स्पर्धेच्या युगात मोठ-मोठ्या विदेशी कंपन्या, उद्योगपतींच्या कंपन्यापुढे किरकोळ व्यापारी जगला पाहिजे. यासाठी तुमच्या समस्या, अडी-अडचणी केंद्र शासनापर्यंत पोहचविण्याचे काम केले जाईल. असे प्रतिपादन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात २० डिसेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र व्यापार संघटना प्रतिनिधी मेळाव्याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष   श्री. शामजी जाजू यांनी केले. 

उत्तर महाराष्ट्र व्यापार संघटना प्रतिनिधी मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. 

या प्रसंगी श्री शाम जाजू पुढे म्हणाले कि, ‘केंद्रातील सरकार व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करेल कारण कि, प्रत्येक प्रश्नावर सध्याचे केंद्र सरकार अतिशय संवेदनशील आहे. सुरुवातीला भारत देशातील आधुनिक तंत्रज्ञानात प्रामुख्याने संगणक, भ्रमणध्वनीला विशेष विरोध केला गेला मात्र आज त्याची खरी गरज निर्माण झाली असून त्यांचे महत्व वाढले आहे. योग्य वेळ आल्यानंतर योग्य निर्णय घ्यावाच लागतो. त्याप्रमाणे तुमच्या समस्या, प्रश्नांवर केंद्र सरकार निर्णय घेऊन अंमलात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.’ 

अध्यक्षीय भाषणात ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले कि, ‘पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे भारत देशात मॉल संस्कृती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांचा भांडाफोड आम्ही व्यापारी महासंघाच्यावतीने करत आहोत. यामुळे ग्राहकांची फसवणूक करून, फसव्या जाहिराती देऊन, छोटे-मोठे किराणा दुकानदार, व्यापारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत. अशाप्रकारे होत असलेल्या अन्यायाबाबत केंद्र शासनाने कायदा करून तो लवकरात लवकर अंमलात आणावा म्हणजे सामान्य नागरिक हा प्रामाणिकपणे जीवन जगेल आणि व्यापारी, दुकानदार प्रामाणिकपणे सेवा देतील आणि लोकल ते व्होकल प्रमाणे  आत्मनिर्भर भारत अंतर्गत आम्हाला न्याय द्यावा’.

यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री संतोषजी मंडलेचा, सचिन निवगुणे,  उद्योजक श्री.कैलास ठोळे, केशव भवर, नरेंद्र कुर्लेकर आदिंसह उत्तर महाराष्ट्र व्य्पारी संघटनांचे प्रतिनिधी, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे आणि कोपरगाव महिला महासंघाच्या सौ.किरण डागा, सौ.किरण दगडे आदि महिलाही उपस्थित होत्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री संतोषजी मंडलेचा, रिटेल व्यापारी संघटनेचे सचिव सचिन निवगुणे यांनीही मनोगत व्यक्त करत मॉल्स संस्कृतील मत-मतांतरे मांडली. मेळाव्याचे सुत्रसंचालन आणि  उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे सचिव श्री. प्रदीप साखरे यांनी मानले तर प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.सुधीर डागा यांनी केले. 

Post a Comment

0 Comments