आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

वाईन शाँप चालकास सुऱ्याचा धाक दाखवून पाच लाखाला लुटले. चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ; तपास लागत नसल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर.

वाईन शाँप चालकास सुऱ्याचा धाक दाखवून  पाच लाखाला लुटले.

चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ; तपास लागत नसल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर. 



संपादक :--शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक :--योगेश रुईकर पा.

कोपरगाव प्रतिनिधी :-- काही दिवसांपूर्वी शहरातील किशोर वाईन्स हे दुकान चालवण्यासाठी घेतलेले दिलीप शंकर गौंड वय ३५हे शुक्रवारी रात्री१० वा. दुकान आटपून स्कुटी गाडीवरून निघाले होते सोबत कामगार सचिन साळवे हा देखील होता.  ते भाई-भाई मोटार गँरेज जवळ आले आसता त्याच्या पाठीमागून विना नंबरच्या दोन मोटारसायकलीवरुन चार अज्ञात चोरट्यानी आडवले व त्याच्यांजवळील धारधार सुऱ्याचा धाक दाखवून गौड यांच्या जवळील रोख रक्कम ४लाख ९८हजार नउशे रुपये तसेच टँब सँमसंग कंपनीचे दोन स्मार्ट फोन व कागदपत्र आसलेली महत्त्वाची बँग सुऱ्याचा धाक दाखवून पळवून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वरील झालेल्या घटने बाबत दिलीप शंकर गौंड यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोदंनी क्रमांक ८३८/२०२०भां.दं.वि.कलम ३९७',३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भरत नागरे हे करीत आहे.

शहरातील दिवंसेदिवस अशा घटंनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे गुन्हा नोंद केला जातो मात्र नंतर काय तपास होतो?   काही दिवसांपूर्वी भरदिवसा शहरातील श्रद्धा नगरी मधे अक्षय कैलास लोहाडे यांच्या बंगल्यातून पाच लाखांची चोरी झाली होती यात तीन लाख रोख व बाकी दोन लाखांचे सोने हे भरदिवसा लुटून नेले होते.याचा तपास अद्यापही लागला नाही हे आरोपी शोधण्यासही

तपासी आधिकाऱ्याला यश मिळालेले नाही.  दिवंसेदिवस चोऱ्यांच्या घटना मधे वाढ झाली आसून गुन्हांचा तपास लागत नसल्याने नागरिंकामधे  पोलिसांबाबत मोठ्याप्रमाणात  नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक  मनोज पाटील तसेच अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे,उपविभागीय पोलीस आधिकारी संजय सातव , आमदार आशुतोष काळे यांनी लक्ष  घालावे आसा सूर जनतेमधून येत आहे.

Post a Comment

0 Comments