विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकाला सामावून घेणारा भारतीय जनता पक्ष - लक्ष्मण सावजी
भारतीय जनता पक्षामुळे जनसेवेला बळकटी मिळाली - सौ. स्नेहलता कोल्हे
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:------- संघटनात्मक पक्ष गुणात्मक व्हावा, या दृष्टीने काम केलेल्या कार्यकर्त्यांमुळेच भारतीय जनता पक्ष देशातच नव्हे तर जगात अव्वलस्थानी आहे. विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकाला सामावून घेण्याचे काम फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाकडूनच होत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव लक्ष्मणजी सावजी यांनी केले.
राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संकल्पनेतून देशभर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्येही प्रशिक्षण वर्ग पार पडले. प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते या वर्गाचे दिपप्रज्वलन करुन या प्रशिक्षण वर्गाचे
उदघाटन करण्यात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकास मंञी विष्णू सवरा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
उत्तर नगर जिल्हयाचे अध्यक्ष राजेंद्रजी गोंदकर अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीनजी दिनकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदासजी बेरड सर, सोशल मिडीयाचे राज्य संयोजक प्रवीणजी अलई, जिल्हा संयोजक जालींदर वाकचौरे, अॅड रविंद्र बोरावके, जिल्हाउपाध्यक्ष शरदराव थोरात, कैलास खैरे, विनोद राक्षे, सतीश चव्हाण आदीसह तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते. शिर्डी नगरपंचारतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांचा यवेळी सत्कार करण्यात आला.
भारताची वैचारीक मुख्यधारा, भाजपाचा इतिहास व पक्षाची कार्यपध्दती आणि संघटनात्मक भुमिका या विषयावर मार्गदर्शन करतांना श्री सावजी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही कष्टावर उभी राहिलेली संघटना असून देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणारा कार्यकर्ता या पक्षात असून राष्ट्रहित हाच मुळ गाभा आहे. सर्वच क्षेत्रात आपले कतृत्व सिध्द केलेल्या महिलांनाही विचारात घेउन राजकीय पक्षांनी काम केले पाहिजे, त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने पक्ष संघटनेत महिलांचा प्राधान्याने विचार केलेला आहे.
सौ स्नेहलताताई कोल्हे यावेळी म्हणाल्या, देशहित हाच आपला प्रपंच आणि परिवार असल्याची भावना ठेवून काम करणा-या भारतीय जनता पक्षात आपण सर्वजण काम करीत आहोत, ही अभिमानाची बाब असून तळागाळातील घटकापर्यंत काम करण्याचा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा वारसा पुढे चालविण्यास भारतीय जनता पार्टीमुळे निश्चितच बळकटी मिळाली आहे. कोरोना काळात प्रत्येकाचे आरोग्य चांगले रहावे तसेच या महामारीच्या काळात गोरगरीबांपर्यत अन्नधान्य पोहचवून त्यांना आधार देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले. परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेल्या राज्यातील सरकार मराठा आरक्षण, शेतक-यांचे प्रश्न अशा विविध विषयांमध्ये अपयश आले असल्याने त्याचे खापर वारंवार केंद्रसरकारवर फोडण्याचे काम करीत असल्याची टीका सौ कोल्हे यांनी केली. केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या असून त्या समाजापर्यंत पोहचवण्याचे काम आपल्याला प्राधान्याने करायचे आहे, असे सौ कोल्हे म्हणाल्या. आत्मनिर्भर भारत, सोशल मिडीया, 2014 नंतरचा भारत व अंतोदय या विषयावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन केशवराव भवर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व शहराध्यक्ष दत्ता काले यांनी मानले.
0 Comments