विश्वनाथ करिअर अकॅडमीचे माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांचे
देशसेवेचे स्वप्न पूर्ण होईल: आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:----- ग्रामीण भागातील बहुतांश युवकांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा असून देखील योग्य मार्गदर्शन व सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे या युवकांचे देशसेवा करण्याचे स्वप्न अधुरे राहत होते. मात्र शहाजापूर सारख्या ग्रामीण भागात विश्वनाथ करिअर अकॅडमी सुरु झाल्यामुळे ग्रामीण भागातील युवकांचे देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण होतील असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे ग्रामीण भागातील तरुणाईसाठी सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशातून सुरु करण्यात आलेल्या विश्वनाथ करिअर अकॅडमीचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले कि, कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर उत्कृष्ट मार्गदर्शकाची आवश्यकता असते. त्याप्रमाणेच देशसेवेचे स्वप्न पाहत असणाऱ्या प्रत्येक युवकाला सैन्यात भरती होण्यासाठी मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था शहरात उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्याकडून प्रशिक्षणासाठी आकारण्यात येणारे शुल्क पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी अशा संस्थेत प्रवेश घेत नाही. पर्यायाने गुणवत्ता, क्षमता, जिद्द, चिकाटी असून देखील या विद्यार्थ्यांचे देशसेवेचे स्वप्न अधुरे राहत होते. मात्र विश्वनाथ करिअर अकॅडमीच्या माध्यमातून माफक शुल्क आकारले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अकॅडमीचे संचालक निवृत्त सैनिक असून त्यांनी देशसेवा करतांना केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या सेवेत महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडतांना स्पेशल फोर्स, ब्लॅक कमांडो, एनएसजी कमांडो इतरही प्रकारचे अनुभव त्यांच्या गाठीशी असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे देशसेवेचे स्वप्नं पूर्ण होऊन देशाचे भावी सैनिक घडले जाणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सूर्यभान कोळपे, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, माजी सैनिक असोसिएशनचे तालुकाध्यक्ष शांतीलाल होन,कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, विश्वनाथ करिअर अकॅडमीचे संचालक विश्वनाथ जाधव, माजी सैनिक सल्लागार समिती सदस्य अर्जुनराव शिंदे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, राजेंद्र ढोमसे, माजी संचालक वसंतराव आभाळे, गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,शहाजापूरचे सरपंच सचिन वाबळे, मच्छिंद्र हाळनोर,बाळासाहेब ढोमसे, पोलीस पाटील संजय वाबळे,पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष इंद्रभान ढोमसे, मढी खुर्दचे माजी उपसरपंच अनिल गवळी तसेच माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.
१) एक वर्षापूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीत विजयश्री मिळविली. दुर्दैवाने त्याच दिवशी कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील सुपुत्र सुभेदार सुनील वल्टे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असतांना शहीद झाले होते. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त न करता व कोणत्याही प्रकारची विजयी मिरवणूक न काढता आपला विजय शहीद वीर जवान सुनील वल्टे यांना समर्पित केला होता. यावरून आमदार आशुतोष काळे यांना सैनिकांविषयी असलेली आत्मीयता दिसून येते. - शशिकांत वाबळे (माजी सैनिक तथा लोकनियुक्त सरपंच, सुरेगाव
२) सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही देशसेवा करण्याच्या उद्देशातून युवा पिढीला मार्गदर्शन करून देशाच्या संरक्षणासाठी सैनिक निर्माण करण्याची निवृत्त झाल्यापासून इच्छा होती. मात्र ग्रामीण भागात जागेची मोठी अडचण होती. हि अडचण आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे सुटली आहे. आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील युवकांचे सैन्य भरतीचे स्वप्नं साकार होण्यासाठी मदत होणार आहे. -विश्वनाथ जाधव, संचालक (विश्वनाथ करिअर अकॅडमी)
0 Comments