आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावात हळदीच्या कार्यक्रमात तुफान दगडफेक.

 कोपरगावात हळदीच्या कार्यक्रमात तुफान दगडफेक.

अकरा जणांविरोधात गुन्हा दाखलसंपादक :-- शाम दादापाटील गवंडी

उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.कोपरगाव प्रतिनिधी :---  दुसऱ्याच्या लग्नात जावून दगडफेक करुन  अन्नाची व जेवनाच्या भांड्याची नासाडी करुन धिंगाणा घातल्याप्रकरणी अकरा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून नऊ जणांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली तर दोन जण फरार आहे 

याबाबत थोडक्यात माहिती अशी शहरातील टाकळी नाक्या जवळ बौध्द विहार जवळ राहणाऱ्या योगिता संजय थोरात  यांच्या दिराच्या हळदी कार्यक्रम चालू असताना 

आरोपी दिपक राजेंद्र नाईकवाडे,अमोल नरेंद्र पॆकले,दशरथ मच्छिन्द्र त्रिभुवन,शरद मच्छिन्द्र त्रिभुवन,विशाल पिंगळे,विकी सरोदे,अजय दिलीप डावखर,आकाश रोहकले,सचिन साळवे,साईनाथ मच्छिन्द्र त्रिभुवन,गणेश बाबुराव काटे सर्व रा.कोपरगांव यांनी फिर्यादी यांच्या दिराच्या हळदीचा कार्यक्रम चालू असताना यातील आरोपीनीं मजकूर यांनी गैरकायद्याची मंडळी जमून हळदीच्या जेवणाचे कार्यक्रमात दगडफेक करून स्टील पाइप व विटांनी मारहाण करून जेवणाच्या भांड्यांची मोडतोड करून नुकसान केले याबाबत कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी वरील आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गु.र.क्रं. ८३०/२०२० भा.द.वि.कायदा कलम ३२४,३३७,४२७,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०५,३४ प्रमाणे आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करित आहेत.

Post a Comment

0 Comments