Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

राजकीय दबावाला बळी न पडता राकेश मानगावकर यांनी कोपरगाव करांना दिला न्याय.---विजय वहाडणे.

 *राजकीय दबावाला बळी न पडता राकेश मानगावकर यांनी कोपरगाव करांना  दिला न्याय.---विजय वहाडणे.


               *संपादक---शाम दादापाटील गवंडी.*

*उपसंपादक--योगेश रूईकर.*


कोपरगाव प्रतिनिधी--- नुकतीच बदली झालेले पो.नि.मा.श्री.राकेशजी मानगावकर यांना आज कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आदरसत्कार करून निरोप देण्यात आला.

           यावेळी बोलताना नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की, राकेश मानगावकर यांनी कुठल्याही राजकिय दबावाला न जुमानता शहरातील नागरिक, विशेषतः भगिनींना सुरक्षित वाटेल असे काम केले.कोरोना काळात जनतेने मास्क वापरावेत यासाठी कठोर धोरण ठेवले,"एक गाव एक गणपती" उपक्रम यशस्वी केला,गुन्हेगारी नियंत्रणात आणली,सामाजिक स्वास्थ्य ठेवले.त्यांना यावेळी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,नगरसेवक अनिल आव्हाड ,मेहमूद सय्यद,श्री.गालट,श्री.प्रमोद पाटील,योगेश वाणी,चंद्रकांत साठे,अधिकारी-कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

        यावेळी सत्काराला उत्तर देताना  राकेश मानगावकरांंनी  शहरातील नागरिकांनी दिलेले सहकार्य व शुभेच्छा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.लहान मोठा असा कुठलाही भेदभाव न करता मी काम केले.महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवणे माझे कर्तव्य आहे.राजकिय हस्तक्षेप मला मान्य नसल्याने काम करणे सोपे झाले असेही त्यांनी सांगितले.यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments