संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे विचार अंगीकारावेत –काका कोयटे .
संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी :--- कोपरगाव शहरातील सुभद्रानगर परिसरात चैतन्य स्वरूप श्री विठ्ठल रुख्मिणी व श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती उत्सत्वानिमित्त श्री अभिषेक व महापुजा कार्यक्रम नासिक येथील सौ श्रद्धा व कपिल सतीश जगताप यांच्या शुभ हस्ते २६ नोव्हेंबर २०२० रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी कोपरगाव तालुक्यातील समस्त शिंपी समाजाच्या वतीने कै.द्वारकाबाई व कै.ह.भ.प. दामोदर गोविंद निकुंभ यांच्या स्मरणार्थ कोपरगावचे सौ.मालती व श्री.दत्तात्रय दामोधर निकुंभ व नाशिक येथील सौ. श्रद्धा व श्री कपिल सतीशराव जगताप यांच्याकडून श्री विठ्ठल-रुख्मिणी व श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरणी कैवल्यधाम (ध्यान मंदिर ) चे उद्घाटन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचे हस्ते करण्यात आले. तसेच त्या ध्यान मंदिराच्या कोनशीला अनावरण देखील करण्यात आले. श्री दत्तात्रय निकुंभ यांनी स्व.खर्चाने या ध्यान मंदिराचे काम पूर्णत्वास आणले आहे.
या प्रसंगी काका कोयटे म्हणाले की, ‘कोपरगाव तालुक्यातील शिंपी समाज हा मोठ्या प्रमाणात असून धार्मिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे योगदान आहे. सुभद्रानगर परिसरात कैवल्य धाम (ध्यान मंदिर )चे समर्पण करून समाजहिताच्या दृष्टीने उत्तम पाऊल उचललेले आहे. याचा फायदा शिंपी समाजासह इतर जनतेलाही होईल आणि त्यातून संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार होऊन मोठ्या प्रमाणात अंगीकार करण्यास मदत होईल’.
या कार्यक्रमाला नाशिक येथील सौ.वंदना व श्री.सतीश प्रभाकर जगताप, प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक श्री.जनार्दन कदम, नगरसेविका सौ.दिपा गिरमे यांचेसह सामाजिक कार्यकर्ते प्रताप जोशी यांची उपस्थिती होती तर हेमंत चव्हाण, श्री.सुनील खैरनार, श्री.पृथ्वीराज बिरारी (सर) आदीसह कोपरगाव तालुक्यातील समस्त शिंपी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. ध्यान मंदिराच्या बांधकामासाठी सिव्हील इंजिनिअर्स श्री.चंद्रशेखर भोंगळे, श्री.नितीन सदावर्ते उत्कृष्ट वास्तु उभारण्यास अनमोल सहकार्य केले.
0 Comments