आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अनाथांना मिठाई व भेट। वस्तू देत सेवा प्रतिष्ठान ने केली अनोखी दिवाळी साजरी.

 


अनाथांना मिठाई व भेट। वस्तू देत सेवा प्रतिष्ठान ने केली अनोखी दिवाळी साजरी.


संपादक---शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक--योगेश रूईकर.

कोपरगाव प्रतिनिधी:--  समाजाकडून तसेच नातेवाईकांकडून हेळसांड होत आसलेल्या निराधार असाह्य लोकांना दिवाळी निमित्त सेवा प्रतिष्ठान च्या वतीने दिवाळी  निमित्त मिठाई व भेट वस्तू वाटून आपली आनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली. शहरातील सामाजिक कामात नेहमी अग्रेसर आसलेल्या सेवा प्रतिष्ठान ने दिवाळीच्या दिवशी  शहरातील विविध ठिकाणी जाऊन यामध्ये कोपरगाव बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन ,शनी मंदिर, अमरधाम ,जलाराम मंदिर, दत्त पार आदि ठिकाणी राहणाऱ्या वयोवृद्ध विकलांग नागरिकांना मिठाई व भेट वस्तू देण्यात आल्या.जवळपास दिडशे-दोनशे निराधारांना ही भेट देण्यात आली ऐन  दिवाळीच्या दिवशी आपल्याला ही भेट मिळाल्याने अनेकांना यावेळी आश्रू अनावर झाले. तुम्ही केलेल्या ह्या  मदतीने आमची देखील दिवाळी गोड साजरी होत आसल्याची भावना यावेळी आनेकांनी व्यक्त केली.यावेळी सेवा प्रतिष्ठान संचालक चे माजी नगरसेवक  कूष्णा आढाव म्हाणाले की आपले समाज्याप्रती काही देणे लागते  समाजात नेहमी दुर्लक्षीत आसलेल्या निराधार, दिनदुबळ्यांना मदत करतांना खरा आनंद मला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना मिळाला यापुढेही आमच्या सेवा प्रतिष्ठान च्या वतीने  विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आसल्याची हे ते यावेळी म्हणाले या उपक्रमात सेवा प्रतिष्ठानचे  कृष्णा आढाव विशाल निकम बापू वढणे दिनेश गाडेकर अजिंक्य कदम अभिषेक सपकाळ गणेश आढाव ओमकार वढणे  आदी जण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments