Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

ब्रिजलाल नगरमध्ये महिलेचा विनयभंग :गुन्हा दाखल.

 ब्रिजलाल नगरमध्ये महिलेचा विनयभंग :गुन्हा दाखल.


संपादक---शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक--योगेश रूईकर पा.


कोपरगाव प्रतिनिधी:-- शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ब्रिजलाल नगर मध्ये देर्डे फाटा येथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नकुल ठाकरे( पूर्ण नाव माहीत नाही) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील प्रतिष्ठित लोकवस्ती मधील ब्रिजलाल नगर च्या बागेत बुधवार १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास बागेमध्ये महिला असतांना त्या ठिकाणी जाऊन आरोपी

नकुल ठाकरे याने महिलेला अर्वाच्य शिवीगाळ करून सदर महिलेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना घडली आहे. याबाबत पिडीत महिलेच्या तक्रारी वरुन शहर पोलिस ठाण्यामधे आरोपी नकुल ठाकरे याच्या विरोधात गु र रजि.नंबर कलम ८१३/२०२० भादवी कलम ३५४, ३५४(अ), ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो हे कॉ. आर पी पुंड हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments