भोपाळ : सामाजिक बदल सरकार घडवू शकत नाही, त्यासाठी सामाजिक नेत्यांची गरज असते, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. फ्री प्रेस जर्नलनं ही बातमी दिली आहे. ते संघाच्या भोपाळमधील कार्यक्रमात बोलत होते.
त्यांनी म्हटलं, "आपण सगळ्यांनी मिळून समाजाची ताकद ही सामाजिक एकता, पर्यावरणाचं संवर्धन यासाठी वापरली पाहिजे. सामाजिक नेते निर्माण करून त्यांनी कौटुंबिक प्रश्न सोडवायला हवेत. कारण समाज बदलणं हे सरकारला शक्य नाही. हे काम फक्त सामाजिक नेतृत्वच करू शकते."
0 Comments