बहुचर्चित गुटखा प्रकरणात पत्रकारासह मुलांवर खंडणी चा गुन्हा दाखल उत्तर नगर जिल्ह्यात मोठी खळबळ
संपादक:-- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक:-- योगेश रुईकर पा.
शिर्डी प्रतिनिधी :-- बहुचर्चित श्रीरामपूर लगतच्या तालुक्यात गाजत असलेल्या वादग्रस्त गुटखा प्रकरणाणे वेगळेच वळण घेतले आहे या प्रकरणात श्रीरामपूर पोलिस स्टेशन मध्ये एकलहरे येथील नुरमहमद आजम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिळकनगर येथील स्थानिक वृत्तपत्राचे पत्रकार लालमोहमद जाफरमियाॅ जहागीरदार व मुलगा रिजवान लालमोहमद जहागीरदार यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २१६०/२०२०भा द वी ३४१,३८४असा खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने श्रीरामपूर सह उत्तर नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे
माहिती अशी की २५आॅक्टोबर २०२०रोजी रात्री ९वाजेच्या सुमारास फिर्यादी व मित्र अर्जुन दादा मकासरे टिळकनगर येथे घरी जात असताना टिळकनगर येथे पत्रकार व त्यांच्या मुलाने अडवुण चौघा भावना गुटखा प्रकरणात अडकल्याशिवाय राहणार नाही मी पत्रकार आहे सर्वांना कामाला लावतो बातम्या चालुच ठेवतो जो पर्यंत दोन लाख रुपये देत नाही तोपर्यंत त्यावर रिजवान लालमोहमद जहागीरदार म्हणाला हे लोक तसे ऐकणार नाही पैसे देणार नाही तो पर्यंत बातम्या सुरु ठेवाव्या लागतील मी पैसे देणार नाही आमचा संबंध नाही असे म्हणताच माणसे गोळा करायला सुरुवात केली त्यानंतर ६/११/२०२०रोजी श्रीरामपूर येथील पेट्रोल पंपाजवळ पत्रकार व मुलगा भेटला पैसे दे नाहीतर ३२८च्या गुन्हा टाकुन गुंतुन टाकतो बातमी येईल तीन दिवसांची मुदत देतो नाहीतर गुटखा प्रकरणात अडकावतो अशी धमकी दिली तशी फिर्याद श्रीरामपूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल केल्याने पत्रकार व मुलगा या दोघांच्या विरोधात श्रीरामपूर पोलीसांनी प्रशिक्षणार्थी वरिष्ठ अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे मोठी खळबळ उडाली आहे बहुचर्चित गुटखा प्रकरणात तात्कालिन पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे अधिकार अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाला आहे हे माहित असताना या विभागाला अंधारात ठेवून कारवाई केली होती ती कारवाई वादग्रस्त ठरली आहे त्यामुळे गुटखा साठा देखील नष्ट करता आलेला नाही या कारवाईत श्रीरामपूर पोलिसांनी सलमान उर्फ इरफान शब्बीर तांबोळी रा टिळकनगर वैभव शांतिलाल चोपडा साहिल विजय चोपडा विजय शातिलाल चोपडा रा निमगाव संतोष क्षानदेव डेंगळे फिरोज रमजान पठाण करीम आजम शेख यांच्या वर कारवाई केली होती विजय चोपडा ज्ञानदेव डेंगळे यांना जामीन मंजूर झाला होता इतरांना अटक करण्यात आली होती सर्व संशयित जामीन मंजूर झाला आहे या प्रकरणात न्यायालयाने देखील श्रीरामपूर पोलीसांवर ताशेरे देखील ओढले होते अशी माहिती औरंगाबाद हायकोर्टाचे वकील शैलेश चपळगावकर यांनी दिली
0 Comments