Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

दरोड्याच्या तयारीत असलेले ते आरोपी निघाले सराईत गुन्हेगार.दोन दिवसांची मिळाली पोलिस कोठडी.

 दरोड्याच्या तयारीत  असलेले ते आरोपी निघाले सराईत गुन्हेगार.दोन दिवसांची मिळाली पोलिस कोठडी. 


चारचाकी सह सात लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त.


संंपाादक :--  शाम दादापाटील गवंडी
उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.

कोपरगावात प्रतिनिधी:-- कोपरगावा शहर पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत दरोड्याच्या तयारीत आसलेले पाच दरोडे खोर जेरबंद केले आसून चारचाकी वाहन जप्त केले आसून यात दोन आरोपी कारवाईच्या वेळी पळून गेल्याने  त्यांचा शोध सुरू होता त्यातील अणखी एका  गफुर गणी बागवान या दरोडेखोरांला पकडण्यात यश आले आहे तसेच त्या अरोपींना  कोपरगाव येथे न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व स.पो नि.दिपक बोरसे यांनी रविवार सायंकाळी झालेल्या आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.

     तसेच या पाच आरोपी पैकी तीन आरोपी यामधे राहुल पुंडलिक बुधनव, महेश भाऊसाहेब मंचरे, गफुर गणी बागवान यांच्या वर नगर सह इतर जिल्हामधे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहे  


याबाबत अधिक माहिती अशी की २१ नोहेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कातकडे  पेट्रोल पंपासमोर दरोड्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती शहर पोलिसांनी मिळाली कोपरगावा पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शना खाली कोपरगावचे पोलिस स्टेशनचे स.पो.नि दिपक बोरसे यांनी पोलीस पथका समवेत केलेल्या कारवाईत  ७लाख ५० हजार रुपये किंमतीची  स्काँरपीवो गाडी गाडी नंबर  एम एच २३-- एस. एस.७४५८  एक दुचाकी , लोखंडी गज ,कोयता, तीन मोबाईल आदि साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस शिपाई संभाजी शिंदे वय २८ यांच्या फिर्यादीवरून  गुन्हा रुजिष्ठर नंबर ८१६/२०२० भा.द.वि.कलम ३९९,४०२,अन्वये दरोड्यात सहभागी असलेले  संशयीत महेश भाऊसाहेब मंचरे,राहणार गोटुंबे आखाडा राहुरी ,सुरज लक्ष्मण वडमारे वय २२ रा.गेवराई जिल्हा बीड, राहुल पुंडलिक बुदनव वय २२ रा खामगाव जिल्हा बीड, भारत चितळकर व गफुर गणी बागवान रा. लिंभारा मैदान कोपरगाव अशा पाच जणांनवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या कारवाईत पळून जाण्यात यशस्वी झालेला भारत चितळकर हा अद्यापही  फरार  असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.

Post a Comment

0 Comments