शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी शासकीय शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करा :- माजी सभापती सुनील देवकर
संपादक---शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक--योगेश रूईकर.
कोपरगाव प्रतिनिधी---- शासनाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी शासकीय शेतीमाल खरेदी (शासनाने निर्धारित केलेल्या किमतीनुसार) यात प्रामुख्याने मका,सोयाबीन, कापूस इत्यादी पिकांसाठी खरेदी सुरू करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन केली आहे. देवकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की सध्या दिवाळी असल्यामुळे व करोना संकटामुळे शेतकरी हा प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. या कारणामुळे शेतकरी आपला माल मार्केट कमिटीमधे विक्रीस आणत आहे. मात्र तेथे सरकारने ठरवलेल्या किमतीपेक्षा कमी भावाने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. तरी आपण मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातुन सावरण्यासाठी शासकीय शेतीमाल खरेदी केंद्र कोपरगाव येथे लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर सुनील देवकर, तुषार विध्वंस, अनुराग येवले, सतिष आव्हाड, राजेंद्र होन आदी शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
0 Comments