दुटप्पी धोरण डोळयासमोर ठेवणारे नगराध्यक्षांनी विस्थापितांच्या भावनांचा खेळ मांडु नका - स्वप्नील निखाडे.
कोपरगाव प्रतिनिधी---- कोपरगांव शहरातील गेल्या 10 वर्षापासुन प्रलंबित राहिलेल्या विस्थापितांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोपरगांव व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या अंदोलनाला अपेक्षीत नसतांना शहरातील विस्थापितांसह, सर्वांनी पुढाकार घेतल्यामुळे नगराध्यक्षांची विस्थापितांच्या प्रश्नावर मोठी कोंडी झाल्याने विस्थापितांमध्ये संभ्रम निर्माण करुन दुटप्पी धोरण डोळयासमोर ठेवुन काम करणारे नगराध्यक्षांनी विस्थापितांच्या भावनांचा खेळ मांडु नका अशी खणखणीत कानउघडणी कोपरगांव नगरपरिषदेचे उपनगरध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केली आहे.
शहरातील आरोग्य, पाणी, रस्ता यासह कोणताही प्रश्न असो तो सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोणतेही राजकारण, विरोध न करता सभागृहातील सर्व विषयांना सहमती देवुन विषय मंजुर केले. विस्थापितांच्या प्रश्नावर सभागृहात नगराध्यक्षांनी षडयंत्र करुन विस्थापितांच्या विषयात अडथळा आणले परंतु नगरसेवकांनी ते अडथळे बाजुला करुन विस्थापितांच्या प्रश्नाला मंजुरी दिली ठराव केले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने निवडुन दिलेले नगराध्यक्षच जनतेचे राहिलेले नाही, जनतेचे प्रश्न मार्गी न लागता जनतेची कशापध्दतीने दिशाभुल करता येईल यातच नगराध्यक्ष व्यस्त असल्याची टिका उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केली.
0 Comments