कोपरगाव प्रतिनिधी :--- कोरोनो काळात आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व सामान्य नागरिकांना वाढीव वीजबीले देऊन मोठा झटका दिला आहे. कोरोनो कालखंडातील बिले माफ करून सामान्य जनतेची आर्थिक संकटातून सुटका करावी या प्रमुख मागणी साठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांच्या नेतृत्वाखाली आक्रमण झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी विजवितरण कार्यालयावर हल्लाबोल करत अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ऐनवेळी तोडफोड सुरु झाल्याने पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.
मार्च महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोनो संसर्गामुळे लाँकडाउन होते. याकाळात संपूर्ण उद्योग धंदे कामकाज बंद होते. त्यामुळे या काळातील वीजबीले माफ करावी अशी मागणी होत आहे. यासाठी राज्यात सरकार विरोधात संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. विजेच्या दरात सवलत देण्याचे संकेत उर्जामंत्री यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी घूमजाव केले. या आंदोलनात जिल्हाउपाध्यक्ष संतोष गंगवाल , तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, सुनिल फंड, योगेश गंगवाल आदींसह कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
0 Comments