ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या धर्तीवर गावपुढारी झाले सक्रीय

संपादक :--शाम दादापाटील गवंडी
उपसंपादक :--योगेश रुईकर पा.
शिर्डी/राहता प्रतिनिधी:- कोरोनो महामारी आजारामुळे मुदत संपलेल्या राहता तालुक्यातील ग्रामपंचायत वर प्रशासक आले आहे निवडुणक कधी ही लागु शकतात हे लक्षात आल्याने ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ पहात आहे अशा अनेक गावांत गावपुढारी निवडणुकीसाठी सक्रीय झाल्याचे चित्र दिसून येत आहे
आत्ता पासुनच कार्यकर्त्ये चुकुन नाराज तर होणार नाही ना याकडे सत्ताधारी पद अधिकारी बारीकपणे लक्ष देत असल्याचे दिसून येत असुन गावागावात अनेक सामाजिक कार्यकर्ते चे पेवच जणु फुटले असुन मीच कसा ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी पात्र आहे हे दाखवून देण्यासाठी मोठी रस्सीखेच दिसत असली तरी कोरोणा महामारी आजारात लाॅकडाउन असताना कोणी किती काळजी घेतली याचा हिशोब या निवडणुकीत करायचाच असा संकल्प सुध्दा काही मतदारांनी केला आहे पत्नी सरपंच असताना पतीचा होणारा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप काहींना रुचला नाही ते सुद्धा संधीची वाट पाहत असलेतरी आयत्या टायमावर जातीय समिकरणे नातेसंबंध व आर्थिक गणित यावर सुध्दा बरेच काही अवलंबून असते शासकीय योजना कोणत्या केन्द्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना कोणत्या त्याचा फायदा कसा झाला याचे क्षेय कोण घेतो आहे यांचा पण लोकांना जनजागृती यामुळे लक्षात येत असल्याने मतदार आपली भूमिका चोख पणे बजावणार असल्याने याचा फायदा कोणाला कसा होईल हे येणारा काळच ठरविणार आहे कोरोणोमुळे प्रशासकराज आलेला हा अशा ठिकाणी ग्रामसेवक व सरपंच नामधारी झाले होते मात्र केलेल्या विकास कामांची माहिती समक्ष भेटून मतदारांना आकर्षित करण्यासाठी काहींनी सुरुवात देखील सुरू केली आहे गावात न दिसणारी व सहजपणे न बोलणारी मंडळी गावातील पारावर काही वेळ थांबत संवाद वाढवत आहे यामुळे जागरूक मतदारांच्या लक्षात आले आहे की हे निवडणुकीची तयारी आहे पण काही नी मौन धारण केल्याने काही दगाफटका झाला तर काय करायचे यांचे नियोजन देखील निष्ठावान कार्यकर्त्यांकडे हि जवाबदारी देखील सोपविण्यात आली आहे विजयासाठी अनेक युक्त्या वापरूण्यास सुरुवात झाली आहे मंदी असलीतरी
घाबरून जाऊ नको कर्ज झाले तर खचु नको भाउबदकीचे भांडण असेल तर मी पाठीशी आहे बाधावरचे भांडण सरकार दरबारी असेल तर घाबरु नको मुलगा बेरोजगार असेल तर नौकरी लावुन देतो व्यवसाय करायचा असेल तर आपण गावात शाॅपीग सेंटर उभारणार आहे त्यात दुकानासाठी गाळा देतो अशी विविध प्रकारची आश्वासणे देताना दिसुन येत आहे सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा जोर पहाता ग्रामीण भागात उशिरा पर्यंत थाब्यावर देखील गर्दी होतांना दिसुन येत असुन चर्चा लिंक नको म्हणून दुसऱ्या गावातील यासाठी हाॅटेल व थांब्याची निवड केली जात आहे औषधा बरोबरच मांसाहारी जेवणाकडे लक्ष दिले जात आहे मात्र उशिरा घरी गेल्यावर
सौभाग्यवती च्या प्रश्नाचा भडीमार यामुळे सुध्दा काहीजण परेशान झाले असले तरी अनेकांनी खादीचा सदरा घालून जनसंपर्क सुरू केला आहे यामुळे गावपुढारी वाढत असल्याचे दिसून येत आहे यात जेष्ठ नागरिक मात्र वेळेवर बघु काय घाई आहे अशी भुमिका घेतली असल्याचे दिसून येते.
0 Comments