आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी ज्यु. काॅलेजच्या पल्लवी गावित्रेने मिळविले ९९. ७४टक्के गुण.


 संजीवनी ज्यु. काॅलेजच्या पल्लवी गावित्रेने        मिळविले९९:७४टक्के गुण.

                                                       

एमएचटीसीईटीचा निकाल जाहीर.

कोपरगांव प्रतिनिधी ::---  राज्य सामाईक प्रवेश  परीक्षा कक्ष, महाराष्ट्र  राज्य मार्फत आक्टोबर, २०२० मध्ये प्रथम वर्ष  अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र प्रवेशा साठी ऑनलाईन  पध्दतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश  परीक्षेमध्ये (एमएचटीसीईटी) संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या पल्लवी रमेश  गावित्रे या विध्यार्थीनीने ९९. ७४ पर्सेंटाईल मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडवित संजीवनी ज्युनिअर काॅलेजमध्ये प्रथम क्रमांकाची माणकरी ठरली.
राज्य सामाईक प्रवेश  परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत ६ आक्टोबर ते २० आक्टोबर, २०२० दरम्यान प्रथम वर्ष  अभियांत्रिकी व औशधनिर्माण शास्त्र  प्रवेशा साठी ऑनलाईन  पध्दतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेमध्ये संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी  नेत्रदिपक यश  संपादन केले असुन यातील काही गुणवंत विध्यार्थी पुढीलप्रमाणे. कंसात पर्सेंटाईल दिले आहेत. पल्लवी रमेश  गावित्रे ( ९९. ७४ ), रसिका रमेश  सोमवंशी  ( ९८. ७३,  वैष्णवी  राजेंद्र आरोरा (९५. ७१), संकेत संपत कोेल्हे ( ९५. २२), दिव्या बाबासाहेब थोरमारे ( ९५. १५),त्रिवेणी नवनाथ गोरे (९५. ११), अथर्व रमेश  पानगव्हाणे ( ९४. ०९), अक्षय राजेश  म्हाळसकर (९३. ००), श्वेता रविंद्र डहाळे (९२. २१), किरण संजय लुंडगे (९१. २३), संकेत भास्कर मते (९०. ९५), प्रज्वल प्रदिप त्रिभुवन (  ९०. ५५) व तेजस धनंजय क्षिरसागर (९०. ३३).
                                                         
आपल्या यशाबद्दल पल्लवी गावित्रे व रसिका सोमवंशी  म्हणाल्याकी संजीवनी ज्युनिअर काॅलेज मधिल अनुभवी प्राध्यापक वर्ग, नियमित करून घेण्यात आलेला सराव, व्यवस्थापनाने विध्यार्थ्यांसाठी  व शिक्षकांसाठी घालुन दिलेली शिस्त  व मेंटर पध्दती अंतर्गत वैयक्तिक लक्ष या सर्व बाबींमुळे आम्ही सहज चांगले यश  मिळवु शकलो. याचबरोबर आई वडीलांकडून मिळत असलेल्या प्रेेरणेमुुुळे आम्ही चांगल्या यशाला गवसणी घालु शकलो. 
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्य डाॅ. आर. एस. शेंडगे  व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. 

Post a Comment

0 Comments