आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

गुरुनानक यांचा एकतेचा संदेश संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी -आमदार आशुतोष काळे

 गुरुनानक यांचा एकतेचा संदेश संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी -आमदार आशुतोष काळे.

   


संपादक :--- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक:---योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी:----ईश्वर एक आहे तो संपूर्ण चराचरात त्याचे वास्तव्य असून करता करविता परमेश्वर आहे. त्यामुळे आपण प्रत्येकांशी प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक व शिख धर्माचे पहिले धर्मगुरू गुरुनानक यांनी संपूर्ण विश्वाला एकतेचा संदेश दिला आहे. आपले संपूर्ण जीवन त्यांनी जातीवाद व भेदभाव निर्मुलन करण्यासाठी व्यतीत केले. जात-पात, उच्च-नीच व अंधविश्वासाला संपविण्यासाठी सर्वजण एकत्र बसून जेवण करू शकतील त्यासाठी लंगर परंपरा सुरु करून समजाला एकत्र आणलं.  समाजासाठी त्यांनी केलेलं काम अलौकिक असून त्यांचा एकतेचा संदेश व त्यांचे विचार संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

                 शिख समाजबांधवांसाठी अत्यंत पवित्र असणारा दिवस म्हणजे शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले धर्मगुरू गुरुनानक यांचा जन्मदिवस. या दिवशी शीखधर्मीय बांधव गुरुनानक जयंती, गुरुपुरब, गुरुपर्व आणि आणि प्रकाशपर्व साजरे करतात. याच दिवशी धर्मगुरू गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर गुरुद्वारामध्ये लंगरचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे कोपरगाव येथील गुरुद्वारामध्ये देखील लंगरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी गुरुद्वारामध्ये धर्मगुरू गुरुनानक यांच्या ५५१ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून सर्व शीख बांधवाना गुरूपुरब निमित्त शुभेच्छा दिल्या. सर्वानी एकत्र बसून भोजन घेण्याच्या गुरुनानक यांनी १५ व्या शतकामध्ये सुरु केलेल्या लंगर परंपरेमध्ये सहभागी होवून आमदार आशुतोष काळे यांनी सर्वसामान्यांप्रमाणे जीमिनीवर बसून भोजन घेतले.

           यावेळी यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेसंतोष चवंडके,नगरसेवक मंदार पहाडेसंदीप पगारेशिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियालबाबा हरजित सिंगदिपासिंग ठकरालचंद्रमोहन पापडेजासेवासिंग साहणीसनीसिंग पोथीवालराजसिंग भाडियारमेश गवळीधनंजय कहार,दिनकर खरेराजेंद्र खैरनारराजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments