कोपरगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून दगडफेक केल्याप्रकरणी चौंघावर गुन्हा :तर दोघेजण गंभीर जखमी.
संपादक :--शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक:--योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी :--- कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिची बहिण या सार्वजनिक शौचालयात गेल्या असता त्याच भागात राहणाऱ्या मोद्या मंजुळ, सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड यांनी अल्पवयीन मुलगी व तिची बहिण यांचा विनयभंग केल्याची घटना बुधवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली. या बाबत चौघांवर दगडफेक व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला असुन झालेल्या दगडफेकीत अमोल दिलीप विघे राहणार गोरोबानगर व बशीर बागवान हे गंभीर जखमी झाले आहे. याबाबत शहर पोलिस स्टेशनकडून समजलेली माहिती अशी की दत्तनगर भागात राहणाऱ्या या दोन बहिणी सार्वजनिक शौचालयात गेल्या असता वरील चौघे आरोपी यांनी त्यांच्याशी लगट करून फिर्यादीच्या बहिणीचा हात धरून ओढले. फिर्यादी व तिची बहिण शौचालयात पळत गेल्या असता आरोपी यांनी त्यांच्या पाठीमागे जाऊन शौचालयाच्या दरवाजावर थापा मारून उघडा उघडा असे म्हणून विनयभंग करून दमदाटी केली. तसेच या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकांवर दगडफेक केली. यात अमोल विघे व बशीर बागवान यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घडलेल्या घटनेबाबत वरील चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गु र नंबर व कलम ८१४/२०२० कलम ३५४ ,३५४ (अ), ३५४(ड), ३२४, ३३७, ३२३,५०४, ३४ व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८/१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, शहर पोलिस ठाण्याचे स पो नि दिपक बोरसे यांनी भेट दिली असुन यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार आहे. सध्या परिस्थिती निवळली असून तणाव पूर्ण शांतता आहे. पुढील तपास स.पो.नि.दीपक बोरसे हे करत आहे.
0 Comments