अपयशाचे खापर केंद्रावर फोडु नका, राज्यातील जनतेची विजबिले माफ करा - सौ स्नेहलता कोल्हे.

संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक :- योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी :----जनतेचा कौल नसलेले महाविकास आघाडी सरकार असून जनतेच्या प्रश्नंशी राज्यकर्तेंना काहीही दे्णे्घेणे नसलेल्या सरकारला सामांन्य नागरीकांचे प्रश्न सोडवायचे नाही. महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ बिले देउन जनतेची चेष्टा चालविली आहे. विजबीले माफ करण्याचा शब्द फिरवुन जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे ही वाढीव बीले आम्ही भरणारच नाही. सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरत असून या अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी केले.
नागरीकांना वाढीव विजबिलात सवलत मिळणार नाही, त्यांना ती भरावी लागतील असे राज्यातील उर्जामंत्री यांनी जाहीर केले.तर दुसरीकडे महावितरण सक्तीने विजबीले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. याचा निषेध करण्यासाठी तसेच वाढीव वीज बिलाची होळी करण्याचे आंदोलन आज राज्यभर करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथील विज मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राज्यातील जनतेची विजबीले माफ करावीत या मागणीसाठी विज बिलाची होळी करून निषेध व्यक्त केला. यावेळी सौ कोल्हे बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या, राज्यातील सरकार गोंघळलेले सरकार आहे, या सरकारमधील मंत्री वेगवेगळे बोलत आहे. खोटे बोल पण रेटून बोल एवढीच भूमिका पार पाडत आहेत. खुर्चीसाठी एकत्र आलेले हे सरकार संवेदनशुन्य सरकार आहे. त्यांना शेतकरी आणि नागरीकांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. वास्तविक कोरोना काळामध्ये दैनंदिन व्यवहार ठप्प झालेले असल्याने अनेक छोटया मोठया व्यावसायिकांना, हातावर पोट असलेल्यांना आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे, स्वतःला सावरण्यात प्रत्येकाची कसरत करावी लागत असतांना त्यात महावितरणने वाढीव विजबीलेे पाठवुन जनतेवर अन्याय केला आहे. हा केवळ भाजपाच्या आंदोलनाचा विषय नाही तर या अन्यायाचा रोष व्यक्त करण्यासाठी राज्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. एकीकडे विजबीले माफ करण्याचे सांगतात तर दुसरीकडे भरमसाठ विजबीले पाठवुन हे सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. संकटाच्या वेळी पाठीशी उभी राहण्याची सरकारची जबाबदारी असतांना केवळ आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे.
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष शरदर थोरात, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, औदयोगिक वसाहतीचे संचालक केशव भवर, पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर, शिवाजी लहारे, विनोद राक्षे, दिपक गायकवाड, जितेंद्र रणशुर, कांदा उत्पादक संघटनेचे वसंत देशमुख, कोपरगाव व्यापारी संघर्प समितीचे अकबर शेख, देशमुख, कैलास रहाणे आदींनी सरकारच्या कारभारावर टीका केली. भारतीय जनता पार्टीचे पक्षनिरीक्षक अशोक पवार, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, कैलास खैरे, शहराध्यक्ष दत्ता काले,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, गटनेते रविंद्र पाठक, मछिंद्र केकाण, पंचायत समितीच्या सदस्या सुनिता संवत्सरकर, शहराध्यक्ष शिल्पा रोहमारे आदींसह विविध संस्थाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, नागरीक व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव रोहोम यांनी केले, सुत्रसंचालन सुशांत खैरे यांनी तर आभार शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केले.
0 Comments