नवी दिल्ली : भाजपनं काश्मिरी पंडितांचा वापर व्होट बँकेसाठी केला आणि अद्यापही काश्मिरी पंडित खोऱ्यातील पुर्नवसनाच्या प्रतीक्षेत आहेत, असं वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये खरा विकास तेव्हाच होईल, जेव्हा इथं लोकांचं सरकार असेल, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
28 वर्षांपासून ते म्हणत आहेत की काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन करू, पण आता 5
वर्षांहून अधिक काळापासून ते सत्तेत आहेत. पण अजून काश्मिरी पंडित
प्रतीक्षेत आहेत, असं अब्दुल्ला यांनी म्हटलंय.
0 Comments