चासनळी ते दहिवाडी रस्त्याचे काम प्रगतीपथावर
रहिवाशांनी माजी आमदार कोल्हे यांचे मानले आभार
उपसंपादक:-- योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी :---- तालुक्यातील पश्चिम भागातील चासनळी ते दहिवाडी रस्त्याचे काम प्रगतीपथावर असुन या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबददल माजी आमदार सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांचे आभार व्यक्त केले.
नाशिक आणि नगर जिल्हयाला जोडला जाणारा चासनळी ते दहिवाडी या रस्त्याचे काम सुरू असुन प्रगतीपथावर आहे. काम पुर्ण झाल्यानंतर या भागातील नागरीकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. माजी आमदार सौ कोल्हे यांनी मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी मोठया प्रमाणात निधी आणला. त्यामुळे अनेक रस्त्यांचे कामे मार्गी लागले. या परिसरातील नागरीकांना महत्वाचा असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी सौ कोल्हे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2017-18 या अंतर्गत 1 कोटी 4 लाख 47 हजाराचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सुमारे 2 किलोमीटर रस्त्याच्या कामास नुकतीच सुरूवात झाली असुन काम प्रगतीपथावर आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मनेष गाडे, अशोक आहेर, उपसरपंच मनोज गाडे, राहुल चांदगुडे, चंद्रकांत चांदगुडे, विष्वासराव गाडे, सुनिल सुरभैया, राजेद्र गाडे, संतोष कदम , आबासाहेब गाडे यांनी या कामाची पहाणी केली. माजी आमदार सौ कोल्हे यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबददल चासनळी ग्रामस्थानी आभार मानले.

0 Comments