८०हजारांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या महिला डॉक्टरला रंगेहाथ पकडले.
नगर लाचलुचपत विभागाची कारवाई.
संपादक :--- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक :--- योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी :- आजार पणा मुळे रजेवर आसलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकाचे १ लाख ३९हजार एवढे वेतन काढून देण्यासाठी ८४ हजार रुपये(६०%)एवढी लाचेची मागणी करणाऱ्या व ती घेताना प्राथमिक जिल्हा आरोग्य केंद्राच्या डॉ रजनी रामदास खुणे (वय ५७) यांना नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टिमने काल २६ नोहेंबर रोजी रंगेहाथ पकडल्याच्या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार हे संगमनेर येथील रहिवासी असून ते जिल्हा प्राथमिक केंद्रात आरोग्य सेवक या पदावर नोकरीस आहे ते १/९/२०१४ते १६/१/२०१५च्या दरम्यान आजारपणाच्या रजेवर होते. त्या दरम्यानच्या कालावधी चे वेतन त्यांना मिळाले नव्हते ते मिळण्याकरिता त्यांनी २०१९मध्ये जिल्हा हिवताप अधिकारी यांना अर्ज केला होता त्यावरून जिल्हा हिवताप अधिकारी यांनी या कालावधीचे वेतन रु.१लाख ३९हजार काढून तक्रारदार यांच्या खात्यात दि.१९/११/२०२०रोजी जमा केले होते वेतन काढल्याचे काम केले म्हणून डॉ. रजनी रामदास खुणे यांनी २६ नोहेंबर रोजी ८४हजार रुपयांची लाच तक्रारदार यांच्या कडे मागितली होती त्या वर तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नगर यांच्याशी संपर्क साधला त्यावर लाचलुचपत च्या पथकाने सापळा रचून जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय चितळे रोड ,अहमदनगर.या ठिकाणी डॉ रजणी खुणे यांना ८० हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. या यशस्वी सापळ्यात सापळा अधिकारी हरिष खेडकर पोलिस उप अधिक्षक, ला.प्र. वि.नगर
सहा. सापळा अधिकारी शाम पवरे पो.नि.,दिपक करांडे, यांनी ही यशस्वी कामगिरी केली त्यांना सुनील कडासने पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक ,निलेश सोनावणे अप्पर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक., दिनकर पिंगळे उप अधिक्षक ला.प्र.वि. नाशिक यांनी मार्गदर्शन केले. या घटनेने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात खळबळ उडाली आहे.
0 Comments