कोपरगाव पोलिसांच्या कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडले.
चारचाकी सह सात लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त.
संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.
कोपरगावात प्रतिनिधी:-- कोपरगाव शहर पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेले पाच दरोडे खोर जेरबंद केले आसून चारचाकी वाहन जप्त केले असून यात दोन आरोपी कारवाईच्या वेळी पळून गेल्याने त्यांचा शोध सुरू आहे अशी माहिती स.पो नि.दिपक बोरसे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की २१ नोहेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कातकडे पेट्रोल पंपासमोर दरोड्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती शहर पोलिसांनी मिळाली कोपरगावा पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शना खाली कोपरगावचे पोलिस स्टेशनचे स.पो.नि दिपक बोरसे यांनी पोलीस पथका समवेत केलेल्या कारवाईत ७लाख ५० हजार रुपये किंमतीची स्काँरपीवो गाडी गाडी नंबर एम एच २३-- एस. एस.७४५८ एक दुचाकी , लोखंडी गज ,कोयता, तीन मोबाईल आदि साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस शिपाई संभाजी शिंदे वय २८ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रुजिष्ठर नंबर ८१६/२०२० भा.द.वि.कलम ३९९,४०२,अन्वये दरोड्यात सहभागी असलेले संशयीत महेश भाऊसाहेब मंचरे,राहणार गोटुंबे आखाडा राहुरी ,सुरज लक्ष्मण वडमारे वय २२ रा.गेवराई जिल्हा बीड, राहुल पुंडलिक बुदनव वय २२ रा खामगाव जिल्हा बीड, भारत चितळकर व गफुर गणी बागवान रा. लिंभारा मैदान कोपरगाव अशा पाच जणांनवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत भारत चितळकर व गफुर बागवान हे दोघे फरार झाले असून यांचा शोध सुरु आहे.तर तीन संशयितांना अटक करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. कोपरगावा शहरात अवैध व्यवसाय भुरट्या चोऱ्या,मारामाऱ्या, दारु, व्यवसाय ,मटका ,गांजा विनामास्क फिरणारे नागरिक यांचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
वाहनांवर आर्मीचा लोगो
दरोडेखोरांकडे सापडलेल्या चार चाकी स्कारपिओ च्या वाहनांवर आर्मी असे काचेवर तर नेमप्लेटच्या मध्ये सुरक्षाव्यवस्थेच्या संबंधित लोगो लावलेला दिसुन येत असल्याने कोपरगाव पोलिसांनी कठोर चौकशी सुरू केली आहे असे समजते
0 Comments