Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

कोपरगावात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहराला पुन्हा दबंग पोलीस निरीक्षकाची गरज.

 कोपरगावात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहराला पुन्हा दबंग पोलीस निरीक्षकाची गरज.संपादक:-- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक:-- योगेश रुईकर पा.


कोपरगावात प्रतिनिधी :--- कोपरगाव  शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन दबंग पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या बदली नतंर शहरातील  वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पोलीस निरीक्षकाची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. कोपरगाव शहर हे अति संवेदनशील आसुन आठ- दहा दिवस उलटूनही आजुनही पोलीस निरिक्षक नसल्याने शहरातील वाढलेल्या चोऱ्या चार दिवसापूर्वी निवारा परिसरात दिवसाढवळ्या चार लाखांची झालेली, लुट, महिलांच्या छेडछाडी चे वाढलेले प्रकार , हाणामाऱ्या ,वाढलेले अवैध धंदे, ४ लाखांच्या चोरीचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही. आरोपी मोकाट आहे यामुळे पोलिसांचा धाक कमी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्या काही नागरिक मास्क न वापरणे, दुचाकीवर डबल टिबल शीट फिरणे रात्री उशिरापर्यंत टवाळक्या करणे यामुळे शहरात पुन्हा कोरोनाचे सावट गडद होताना दिसत आहे. लाँकडाउन च्या काळात  व नंतरही तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नियम मोडणाऱ्यांना  कधी काठीचा प्रसाद तर कधी गुन्हे दाखल करुन स्वत:ला पुढारी समजणांऱ्या पासुन ते  सर्व सामान्य नागरिकांमध्ये मोठी जरब निर्माण केली होती तीच पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी कर्तबगार आधिकाऱ्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील  यांनी वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी शहराला लवकरात लवकर  कर्तव्यपरायण पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक  करावी. त्याचप्रमाणे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आशुतोष काळे यांनी देखील वरिष्ठ पातळीवर हालचाल  करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांसह महिला वर्गातुन मोठ्या प्रमाणात होत आहे. जेणेकरून शहरातील कायदा- सुव्यवस्था अबाधित राहील.


Post a Comment

0 Comments