आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

तीन पोलिस स्टेशन च्या इमारती शिर्डी शहरातील वैभवात टाकणार भर
तीन पोलिस स्टेशन च्या इमारती शिर्डी शहरातील वैभवात टाकणार भर.


संपादक :- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक:- योगेश रूईकर पा.

शिर्डी प्रतिनिधी :---- येथील साईबाबा मंदिर हे दुसरे क्रमांकाचे तिर्थक्षेत्र असल्याने वर्षाकाठी तीन कोटी भाविक येत असलेल्या साईनगरीत भव्य पोलिस स्टेशन व इमारत असावी यासाठी माजी विरोधी पक्षनेते आ राधाकृष्ण विखे-पाटील  खा डॉ सुजय विखे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा करून   भरिव असा निधी उपलब्ध  करून दिला त्या निधीतून  १लाख १३हजार स्केअर फुट  बांधकाम सुरू असलेल्या तीन प्रगतीपथावर  यामुळे शिर्डी शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

      पोलिस इमारतीमुळे  पोलिस दादांना मिळणार समाधान

  अनेक वर्षांपासून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा मोठा प्रश्न होता  मात्र यासाठी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे-पाटील व खा डॉ सुजय विखे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम लगतच्या काळात पुर्ण होत आहे या कामाचे श्रेय विखे कुटुंबाला जाते विकासाभिमुख कामे कशी उभी राहतात हेच यातुन दिसून येते 

मनोज रत्तिलाल लोढा

सामाजिक कार्यकर्ते शिर्डी

अधिक माहिती अशी की शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर  साईभक्त भाविकांचा वावर असतो  अशावेळी पोलिस प्रशासणावर कामाचा मोठा ताण येत असतो अनेक कर्मचारी तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरून ये-जा  करत होते शिर्डी सारख्या ठिकाणी रुम भांडे  भरणे महाग असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड  पोलिस कर्मचारी यांना बसत होता या इमारतीचे काम भुतडा कन्स्ट्रक्शन चे संचालक चेतन भुतडा व शितल भुतडा यांच्यामार्गदर्शनाखाली सुरू आहे माहिती देताना चेतन भुतडा यांनी सांगितले की एक पोलिस स्टेशन   व ११२पोलीस कर्मचारी राहतील अशा सर्व सुविधा युक्त दोन सातमजली इमारती चे काम अंतिम टप्प्यात असून यात दोन इमारती मध्ये टु बिएच के ११२फॅल्ट आहे  अशा तीन बिल्डीग चे काम जलदगतीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे यात पोलिस स्टेशन ची भव्य इमारत असुन  उपविभागीय अधिकारी कार्यालया  वाहतूक शाखा बाॅम्ब शोधक पथकसाठी आॅफीस स्त्री पुरुष लाॅक अप  मिटीग हाॅल  पोलिस निरीक्षक आॅफीस  ठाणे अंमलदार यांना बसण्यासाठी जागा पार्कीग  गार्डन  शौचालय व २४तास पाणी अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जवळपास ८०टक्के काम पूर्ण झाले असून मार्च अखेर काम पूर्ण होईल असे सांगितले हे काम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण सोसायटी च्या माध्यमातून सुरू आहे सदरचे काम श्रीनाथ  कन्सटक्शन व वास्तुविशारद भुतडा कन्सटक्शन च्या माध्यमातून सुरू आहे या इमारतीमुळे शिर्डी शहराच्या वैभवात भर पडणार असुन निमगाव कोर्राळे ग्रामपंचायत हद्दीतीत हे काम सुरू आहे यामुळे पोलिस कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा  प्रश्र्न मार्गी लागणार आहे अनेक कर्मचारी भाडोत्री घरे घेऊन जवळपास राहत होते त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता ती अडचण दूर होणार आहे यावेळी सुरू असलेल्या कामाबद्दल शासकीय अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.


Post a Comment

0 Comments