भरदिवसा पावणेचार लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आवाहन.
संपादक---शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक--योगेश रूईकर.
कोपरगाव प्रतिनिधी.---- शहरातील कायदा सुव्यवस्थे चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ऐन दिवाळी काळात घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत असलेल्या श्रद्धानगरी भागात राहणारे अक्षय कैलास लोहाडे वय २६ यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून ३लाख ६५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करून २लाख४० हजारांची रोकड, दोन तोळे वजनाची सोन्याची चैन, पाच ग्रँम वजनाच्या सोन्याच्या सहा अंगठ्या असा एकुण ३लाख ६५ हजारांचा ऐवज दुपारी १२ ते १.४५ च्या दरम्यान चोरून नेला. याबाबत अक्षय कैलास लोहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गु र ८१२/२०२० भादवी कलम ४५४, ३८० प्रमाणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दिपक बोरसे हे करत आहेत.
भर दिवसा चोरीच्या घटना होत आसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची बदली झाल्याने सध्या शहर पोलीस निरीक्षक हे पद रिक्त असून शहराला पुन्हा एकदा दबंग पोलीस निरीक्षकाची आवश्यकता आहे.
0 Comments