जामदार हार्डवेअरचे आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते उदघाटन.
संपादक---शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक--योगेश रूईकर.
कोपरगाव प्रतिनिधी:- भारतातील सर्वात मोठी वॉटर हिटरचे उत्पादन करणाऱ्या नावाजलेल्या सुप्रीम कंपनीच्या विविध उत्पादनांच्या भव्य अशा मे.जामदार हार्डवेअरचे उदघाटन तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार असल्याची माहिती जामदार हार्डवेअरचे संचालक रविंद्र पा.जामदार यांनी दिली. तसेच याविषयी अधिक माहिती देतांना ते म्हणाले सुप्रीम कंपनी ही भारतातील मोठी कंपनी आहे. दर्जेदार विविध उत्पादने यात प्रामुख्याने शेती तसेच हार्डवेअर, सोलर वॉटर हिटर आदी उत्पादनांमधे सुप्रीमचे नाव अग्रेसर आहे.
याच धर्तीवर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, प्रत्येक घरामध्ये वॉटर सोलरच्या मागणीच्या आवश्यकतेमुळे आपण नागरीकांच्या सेवेसाठी जामदार हार्डवेअरची सुरुवात तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिनिंग अँन्ड प्रेसिंग कॉम्प्लेक्स मधे सुरु करत असल्याचे ते म्हणाले. तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जिनिंग अँन्ड प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार व गौतम बँकेचे माजी संचालक ज्ञानदेव पा. जामदार यांनी केले आहे.
0 Comments