साईभक्त एस. गोपीकृष्णन यांची कुंभारी ट्रस्टला साईंची मूर्ती भेट
संपादक---शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक--योगेश रूईकर
कोपरगाव प्रतिनिधी-----कोपरगाव- श्री श्री श्री १००८ प.पु.राघवेश्वरा नंदगिरी तथा उंडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर वसलेल्या राघवेश्वर देवस्थानला यादव परिवाराने राघवेश्वर मंदिरास दिलेल्या सदिच्छा भेट प्रसंगी त्यांचे मित्र सतीश नीलकंठ यांच्याकडे साईबाबा मंदिराबाबत आणि साईंची मूर्ती भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी त्यांचे हैद्राबाद येथील मित्र एस.गोपीकृष्णन यांचेशी चर्चा करून राघवेश्वर देवस्थानला साई बाबांची ५ फुट ३ इंच मूर्ती भेट दिली. साईबाबांच्या मूर्तीची कुंभारी येथे नव्याने बांधलेल्या साईमंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
या पवित्र ठिकाणी गोशाला असून जवळपास ५० गावरान गायींची देखभाल केली जाते. दक्षिणवाहिनी गोदावरी गंगेकाठी असलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्री अनेक दूरदूरचे भाविकांना सामर्थ्याची प्रचीती येत असते. धार्मिक अनुष्ठानाचे तपासाठी वंदनीय उंडे महाराजांचे मार्गदर्शनाखाली कुंभारी येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थान येथे भाविक नेहमी दर्शनासाठी येत असतात.
0 Comments