आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सोशल डिस्टनसिंग पाळत व्यापारी व नागरिकांनी दीपोत्सव साजरा करावा.- प्रशांत सरोदे

 सोशल डिस्टनसिंग पाळत व्यापारी व नागरिकांनी दीपोत्सव साजरा करावा.- प्रशांत सरोदे 


संपादक---शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक--योगेश रूईकर.

       कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)-  संपूर्ण जगाची आर्थिक नाकेबंदी करणाऱ्या करोना च्या महामारीमुळे अनेकांना आपला जीव जमावावा लागला आहे.गेल्या नऊ महिन्यापासून करोना मुळे बाजार पेठ,छोटं-मोठे उद्योग धंदे बंद झाले असून ऐन दिवळीतही करोनाचा धोका टळलेला नसून तो अद्यापही आहे.त्यामुळे छोट- मोठे व्यापारी नागरिक,फेरी वाले यांनी स्वतःची काळजी घेत मास्क वापरत, सोशल डिस्टनसिंग पाळून दिवाळ सण साजरा करावा असे आवाहन कोपरगाव नगर परिषदेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी व करोना योद्धा प्रशांत सरोदे यांनी केले आहे.

     तसेच ते पुढे म्हणाले की , गेल्या अनेक दिवसांपासून करोना मुळे नाविलाजास्तव अनेक वेळा शहरात भरणारा आठवडे बाजार,इतर बाजार शहरामध्ये जास्तीत जास्तठिकाणी भरवून करोनाचा धोका वाढून नये यासाठी प्रामाणिक प्रयन्त केला आहे. याला नागरिक व व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला म्हणून आज मितीस शहर व तालुक्यातील नागरिकांना करोना पासून बचाव होण्यास मोठी मदत झाली आहे हे नाकारता येणार नाही.सध्या दिवाळी सण लक्षात घेता पालिकेकडून कोणत्याही व्यापारी व फेरीवाले यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेत ३२ फटाके स्टोल असो किंव्हा सणासाठी लागणाऱ्या इतर वस्तू विकणारे छोट- मोठे दुकारणदार यात प्रामुख्याने पूजेचे साहित्य ,फराळ,आकाश कंदील,रांगोळी,पणती आदी समान विकणाऱ्यांना पालिकेने दि १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधी मध्ये शहरातील मुख्य बाजारपेठेत व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे.मात्र व्यवसायिकांसह नागरिकांनी गर्दी न करता मास्क लावत खरेदी करावी .त्यामुळे आपल्यासह इतरांना देखील कोणता धोका पत्करावा लागणार नाही हे महत्वाचे आहे.आगामी काळामध्ये देखील करोना पासून बचाव होण्यासाठी पालिका स्तरावर विविध प्रकारच्या उपाय योजना प्रभावी पणे पालिकेच्या माध्यमातून राबवणार असल्याचेही मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

0 Comments