आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण----- सुमित कोल्हे.


  संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण----- सुमित कोल्हे.

आगामी पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर  उपक्रम






संपादक---शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक--योगेश रूईकर.


कोपरगांव प्रतिनिधी------ महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या आगामी पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त तरूणांची निवड होणेसाठी, त्यांना मैदानी कसोट्यांचे व लेखी परीक्षांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने तीन महिण्यांचे प्रशिक्षण संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली देणार असल्याची माहिती संजीवनी फाऊंडेशनचे सचिव व युवा कार्यकर्ते श्री सुमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 
श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की ग्रामीण भागातील युवकांमध्ये शारीरिक क्षमता व बुध्दिमत्ता असताना देखिल योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते पोलीस भरतीपासुन वंचित राहु शकतात, या अनुषंगाने त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे या हेतुने संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी असे तीन महिन्यांचे प्रशिक्षण संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर फाॅर सिव्हिल अँड डीफेन्स सर्विसेस या संस्थेमध्ये देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक युवकांनी ट्रेनिंग सेंटरचे निवृत्त सैनिकी अधिकारी श्री दादासाहेब तिवारी (९८२२३४४४९३) यांचेकडे नाव नोंदणी करावी. अशा युवकांचा मेळावा दि. २३ नोव्हेंबर रोजी संजीवनी प्रि कॅडेट सेंटरमध्ये घेण्यात येणार आहे व प्रत्यक्ष प्रशिक्षणास १ डिसेंबर पासुन सुरूवात करण्यात येणार आहे. 
सुशिक्षित युवक-युवतींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी यापुर्वी कोवीड १९ च्या काळात नामांकित कंपन्यांना संजीवनी अभियांत्रिकी व पाॅलीटेक्निक मध्ये आमंत्रित करून कोविड १९ चे मार्गदर्शक तत्वे पाळुन परीसर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे ४०० मुला मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यात फाऊंडेशनला यश प्राप्त झाले. आता युवकांना पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने महाराष्ट्र शासनाने पोलिसांची १३००० पदे भरण्याचे जाहिर केलेले आहे, यातही युवकांसाठी मोठी संधी मिळेल, असा आशावाद श्री कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. 
श्री कोल्हे पत्रकात पुढे म्हटले आहे की माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांची नेहमी खंत असायची की आपल्या तरूणांना सैन्यात संधी कमी मिळते, त्यांना योग्य प्प्रशिक्षण दिले तर त्यांची सैन्य दलात निवड होण्याची संख्या वाढु शकते, या हेतुने त्यांनी १५ सप्टेंबर, १९९२ रोजी संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर फाॅर सिव्हिल अँड डीफेन्स सर्विसेस या सेवाभावी संस्थेची स्थापना केली, आणि आत्तापर्यंत ग्रामिण भागातील सुमारे १९९७ कॅडेटसला पोलीस, बाॅर्डर सिक्युरीटी फोर्स, डीफेन्स, सेंट्रल रिजर्व पोलीस, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरीटी फोर्स, अशा विविध क्षेत्रात नोकऱ्यांची संधी मिळाली, यातील काहींनी अतुलनिय कार्य करीत राष्ट्राच्या सेवेत योगदान दिले. संजीवनी फाऊंडेशन अंतर्गत देण्यात येणाऱ्या पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त युवकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन श्री सुमित कोल्हे यांनी शेवटी केले आहे. 
 
Hd_9MTEh.jpg

Post a Comment

0 Comments